मौदा कृषी उत्पन्न बाजारसमितीत शेतमालाची आवक वाढली

नागपूर मौदा विदर्भ

मौदा ता प्र सद्या देशात लॉक डाऊन आहे परंतु आवश्यक सेवा सुरळीत सुरू आहे त्यात शेतकऱ्यांना आपल्या शेतातील शेतमाल बाजार पेठेत आणण्याची सूट देण्यात असल्यामुळे मागील काही दिवसात मौदा कृषी उत्पन्न बाजार समितीत शेत मालाची आवक वाढली असल्याची माहिती बाजार समितीचे माजी संचालक राजेंद्र लांडे यांनी दिली आज शेतकरी गहू चना तूर बाजारात विक्री साठी आणत आहे मागील काही दिवसात तालुक्यात झालेला अवकाळी आणि वादळी पाऊस यामुळे शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे पण पण या आपत्तीतून काही प्रमाणात वाचलेला थोडाफार माल अनेक शेतकरी विक्रीसाठी आणत आहे सरासरी उत्पन्न कमी झाल्यामुळे अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे सध्या लॉक डाऊन मुळे अनेक मजूर घरीच आहे दैनंदिन गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने मजूर वर्गांना पैशाची गरज आहे त्यामुळे त्यांना मजुरी देण्याच्या दृष्टिने शेतकऱ्यांना आपला माल विक्रीसाठी बाजारात आणावा लागत आहे अशी माहिती एका शेतकऱ्यांनी दिली पण शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी वेक्त केली आहे अवकाळी पावसामुळे शेतमाल खराब झाला असल्याने गहू चना तूर या मालाला योग्य असा भाव मिळणे कठीण झाले त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *