अहमदनगर मध्ये गरजू विधवा व निराधार कुटुंबांना किराणा सामान वाटप

महाराष्ट्र

अहमदनगर मध्ये आज विवेकानंद होलिस्टिक डेव्हलपमेंट सेंटर यांच्यावतीने अहमदनगर शहरामधील रामवाडी झोपडपट्टी परिसरात गरजू विधवा व निराधार कुटुंबांना धान्य, आटा, मसाले, किराणा सामान अशा आवश्यक साहित्यांचे वाटप पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके व पोलीस अधिकारी – कर्मचारी यांच्या हस्ते करण्यात आले. पोलिसांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने व सोशल डिस्टन्स चा वापर करून हे साहित्य वाटप केले.

संपूर्ण देशात चालू असलेल्या लॉक डाऊन मुळे अनेक लोकांचे रोजगार बुडले आहेत. हाताला काम नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. यावेळी समाजातील विविध सामाजिक संस्था, सामाजिक संघटना तसेच स्थानिक प्रशासन सुद्धा विविध ठिकाणी असे फूड पॅकेट्स तसेच किराणा साहित्य वाटप करत आहे. यावेळी कोरोना बद्दल माहिती तसेच संसर्ग होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी याबद्दल जनजागृती सुद्धा करण्यात येत आहे.

देशात, राज्यात, जिल्ह्यात तसेच आपल्या शहरात कोरोनाचा प्रभाव वाढू नये म्हणून सरकारने संचारबंदी लागू केली आहे. लागू केलेली संचारबंदी चे काटेकोरपणे पालन करून आपले, आपल्या घरातील सदस्यांचे तसेच समाजातील आपल्या बांधवांचे आरोग्याचे रक्षण करता येईल. त्यामुळे लोकांनी घरातच थांबावे विनाकारण बाहेर फिरू नये असे आवाहन पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी जनतेला केले आहे. यावेळी यावेळी विवेकानंद होलिस्टिक डेव्हलपमेंट सेंटरचे
शेखर देव, श्रीपाद फाटक, सुनील होरने, विराज आहुजा, रॅम वडागळे, प्रफुल्ल व श्रेयस धसे आदी सदस्य व सुमारे ४० पोलीस अधिकारी – कर्मचारी उपस्थित होते.

आम्ही सुद्धा आमच्या चॅनल च्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण सर्वांनी आपल्या घरातच थांबावे. विनाकारण कोठेही बाहेर फिरू नये. आपल्या घरातच राहावे व सुरक्षित राहावे. आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *